कृषीपर्यटनातून गावातील लोकांना रोजगारची संधी
ग्रामीण लोककलेस प्रोत्साहन मिळण्याकरिता भारुड, भजन या सारखे कार्यक्रम पर्यटकांच्या आवडीनुसार आम्ही आयोजित करतो. तसेच ग्रामीण उदयोगास चालना मिळावी यासाठी हस्तकला व इतर व्यवसायाचे दालन गावक-यांना आपलं गाव मध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे.
स्वच्छता –
संपूर्ण परिसरात तसेच राहण्याच्या ठिकाणी स्वच्छता व टापटिपणाचे काटेकोर पणे पालन होते. तसेच आमचे कुशल मनुष्यबळ आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर आहे.
ठळक वैशिष्ठे –
– महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या ‘महाभ्रमण ‘ योजनेत मान्यता
-सातारा जि. परिषद व महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या वतीने २०१६-२०१७ प्रथम ‘यशवंतराव चव्हाण कृषी पर्यटन गौरव’ पुरस्काराने सन्मानित
– कृषी पर्यटनातून स्थानिक ग्रामस्थांना रोजगाराची संधी. हसतमुख कर्मचारी वर्ग आपल्या सेवेस तत्पर
– स्थानिक महिला बचत गटाना प्रशिक्षण व रोजगार निर्मितीसाठी उत्तेजन
– ग्रामीण जीवनशैलीचा रसरशीत अनुभव आणि लोककलांना प्रोत्साहन
– देशी गाईचे गो पालन, गोसंवर्धन व पंचगव्य चिकित्सा बाबत मार्गदर्शन
– नैसर्गिक शेती व पर्यावरणाबद्दल प्रचार व प्रसार