शोध घ्या
आपलं गाव मध्ये कृषी आधारित जीवनशैलीची नुसती माहितीच मिळतं नाही तर ती जीवनशैली अनुभवायची सुद्धा संधी मिळते. येथे तुम्हाला शेतीच्या विविध प्रकारांबद्दल व शेतीच्या आवजारांबद्दल तसेच आधुनिक पर्यायी ऊर्जा स्त्रोतांबद्दलसुद्धा माहिती मिळते.
सेंद्रिय शेती:
आपलं गाव मध्ये पारंपारिक व आधुनिक पद्धतीने सेद्रिय शेती व इतर उपक्रम जसे मधुमक्षी पालन (मध निर्मिती), गांडूळ खत निर्मिती, गोबरगॅस इत्यादी व अनेक गोष्टींची आपणास माहिती मिळते तसेच जवळून अनुभवायला सुद्धा मिळते.
मुक्त गोठा:
गाई व म्हशी यांचासाठी आरामदायी मुक्त गोठयांची संकल्पना राबवली आहे जेणेकरून त्याची उत्पादकता वाढीस लागेल. गाई व म्हशी यांना डुंबता येण्यासाठी आम्ही गोठ्याजवळ छोट्या तळ्याची व्यवस्था केली आहे.
मिल्किंग:
दूध काढण्यासाठी आधुनिक पद्धतीचा अवलंब करून दुग्ध उत्पादन वाढविण्यात आले आहे.
ग्रीन हाउस:
नियंत्रित तापमान तसेच योग्य प्रमाणात पाणी व खते याद्वारे कमी जागेत जास्त उत्पादन करून विविध प्रकारच्या फुलांची शेती फुलवण्यात आली आहे.
देऊळ:
गावातील देऊळ हे नेहमीच त्या गावातील संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. आपलं गाव मध्ये असलेलल्या विठ्ठल मंदिरात येऊन आपले मन प्रसन्न होईलच पण एक अदभूत मन:शांती आपल्याला लाभेल. आपल्या ध्यान धारणेकरिता आम्ही कुटीरची व्यवस्था केली आहे, जेणेकरून आपली ध्यानधारणा निसर्गाशी अनुरूप होईल.
प्रेक्षणीय स्थळे:
बेलदरे गावाच्या सभोवताली असणार्या् प्रेक्षणीय स्थळांमुळे आपल्याला पर्यटनाचा आनंद मिळतो. यामध्ये देवळे, धरण, धबधबा, पवन ऊर्जा प्रकल्प, किल्ले व शेतीवर आधारित लहान व मोठे उधयोग यांचा समावेश आहे.
प्रेक्षणीय स्थळांमध्ये आपण पाहू शकाल श्री समर्थ रामदास स्वामी प्रस्थापित अकरा मारुती दर्शन, तसेच कोयना धरण – येथे आपल्याला जलउर्जे संबधित अधिक माहिती मिळेले, ओझर्डे धबधबा, दुग्ध प्रक्रिया केंद्, साखर कारखाना, गुराळ, वसंतगड तसेच लघुद्योक प्रकल्पास भेट देऊन बचत गटांसोबत चर्चा करण्याची संधी ; ज्यामुळे मिळेल ग्रामीण अर्थव्यवस्थेबद्दल अधिक माहिती.