+91 8767914747, +91 9764014235
आपलं गाव मध्ये कृषी आधारित जीवनशैलीची नुसती माहितीच मिळत नाही तर ती जीवनशैली अनुभवायची सुद्धा संधी मिळते. येथे तुम्हाला शेतीच्या विविध प्रकारांबद्दल व शेतीच्या आवजारा बद्दल तसेच आधुनिक पर्यायी ऊर्जा स्त्रोतांबद्दलसुद्धा माहिती मिळेल.
आमच्या डॉरमेटरी, कॉटेजेस किंवा कुटीर मध्ये गावातील वास्तव्याचा पुरेपूर अनुभव घ्या. आपलं गावच्या शेतामध्ये नैसर्गिकरित्या पिकवलेल्या फळे व भाज्यांपासून बनलेल्या स्वादिष्ट अन्नाची चव चाखून आपल्यातील खवय्या तृप्त होईल.
आपल्या मनोरंजांनासाठी तसेच आपल्याला आपल्या कुटुंबासोबत एकत्र वेळ घालवता यावा यासाठी आम्ही कॅरम, बुद्धिबळ, टेबल टेनिस, बास्केटबॉल, फूटबॉल, बॅडमिंटन, संगीत खुर्ची, रिंग फेक, झोपळा इत्यादी खेळांची सोय केली आहे.
ग्रामीण लोककलेस प्रोत्साहन मिळवण्या करता भारुड, भजन या सारखे कार्यक्रम पर्यटकांच्या आवडीनुसार आम्ही आयोजित करतो. तसेच ग्रामीण उदयोगास चालना मिळावी यासाठी हस्तकला व इतर व्यवसायाचे दालन गावक-यांना आपलं गाव मध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे.